कृषिदूतांतर्फे रांझणी येथे जागतिक मृदा दिवस साजरा
तळोदा तालुक्यातील रांझणी येथे दि.५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वाढते माती प्रदुषण आणि रासायनिक फवारणीचा वाढता प्रादुर्भाव मातीच्या सुपीकतेचा ऱ्हास करत आहेत या गोष्टींचे महत्व सांगण्यात आले. तसेच माती परीक्षणाचे मार्गदर्शन व फायदे हे दोंडाईचा कृषि महाविद्यालय येथील कृषिदूत रुपेश पाटील, कृष्णकांत पाटील, कुणाल पाटील, शुभम उशीर, गिरीश पाटील या कृषिदूतांनी सांगितले.
या कार्यक्रमाला रांझणीचे लोकनियुक्त सरपंच अजय ठाकरे, उपसरपंच शरद मराठे , हेमराज भारती, सोना पाडवी, कांतीलाल ठाकरे, ईश्वर मराठे, दीपक मराठे आदींसह ग्रामस्थ उपस्तित होते. या कार्यक्रमासाठी दोंडाईचा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी.राजपुत, कार्यक्रम समन्वयक प्रा. रविंद्र देशमुख, कार्यक्रम अधिकारी डॉ.विवेक चव्हाण, प्रा.पराग बागुल, माती विज्ञान विभागाचे प्रा.प्रवीण परतिके यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.