त्रिमूर्ती महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर "महापरिनिर्वाण दिन" साजरा.
तळोदा तालुक्यातील आमलाड येथे विद्या सहयोग बहुउद्देशीय संस्था तळोदा संचलित त्रिमूर्ती महिला महाविद्यालय 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर "महापरिनिर्वाण दिन" साजरा. हा कार्यक्रम इतिहास विभागामार्फत घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली.प्रतिमा पूजन केल्यानंतर शितल दाबी, कीर्ती मराठे, निशा पाडवी या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयीची माहिती दिली.त्यानंतर इतिहास विभागाच्या प्रमुख प्रा. आरजू पिंजारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मिती मधील अमूल्य योगदान व महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य याविषयी माहिती दिली. प्रा. अश्विनी माळी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सांगणारी कविता गायली व चेतना माळी यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या बालपणाविषयी ची माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य किरण वळवी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण आत्मसात करायला हवे व आपले जीवन त्या प्रकारे व्यतीत करायला पाहिजे याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामेश्वरी बत्तीसे यांनी केले व आभार वर्षा नरभवर या विद्यार्थिनीने पार पाडली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.