धानोरा येथे विद्यार्थ्यांनी केले अभिवादन
तळोदा तालुक्यातील धानोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वान दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यानी बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.तळोदा तालुक्यात धानोरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकमेव पुतळा असून तालुक्यातील अनुयानी येथे अभिवादन करण्यासाठी येथे येत असतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना थेट गावात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास्थळी आणून विद्यार्थ्याच्या हातून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अमोल सुर्यवंशी, सहशिक्षक वी जे पाडवी आदी उपस्थित होते.शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.