तळोदा गाे. हु. महाजन न्यू हायस्कूलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
तळोदा, येथील शिक्षणमहर्षी प्राचार्य भाईसाहेब गाे. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मंगळवारी (ता. ६) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब गाे. हु. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक बी. जी. माळी, विज्ञान विभाग प्रमुख एन. एस. शिंपी, कला विभाग प्रमुख एस. बी. मगरे, वरिष्ठ शिक्षक पी. आर. वळवी, पी. व्ही. मगरे, एस. एस. सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.