सरावानेच मेहनतने दर्जादार खेळाडू होण्यास मदत-ए. एल.महाजनत ळोदा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन
तळोदा:- खेळाडूंना सामन्याच्या दरम्यान उत्कृष्ट प्रदर्शन करायचे असल्यास सराव शिवाय पर्याय नाही सरावानेच एक साधारण खेळाडू उच्च दर्जाच्या खेळाडू होण्यास मदत होत असते स्पर्धा खेळणे महत्त्वाचे जिंकणे हारणे हे सुरूच असते अशा पद्धतीचे मार्गदर्शन पर वक्तव्य तळोदा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पर्यवेक्षक व स्पर्धेचे उद्घाटक ए. एल.महाजन यांनी केले
तालुका स्तर स्पर्धेचे आयोजन शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो. हू.महाजन.(न्यू हायस्कूल) चा क्रीडांगणावर करण्यात आले होते यात न्यू हायस्कूल चा संघाने १४ वर्ष वयोगटात विजयी होत जिल्हास्तर स्पर्धासाठी पात्र ठरले आहेत.
तळोदा तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे पर्यवेक्षक श्री ए. एल्.महाजन यांनी केले शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हु. महाजन व शी.ल. माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत १४ वर्षे (मुले) वयोगटात झाल्या शिक्षण वर्षी प्रा.भाईसाहेब गो.हू महाजन शाळेच्या तसेच शासकीय आश्रम शाळा अमोनि तालुका तळोदा यांच्यात अंतिम सामना झाला यात अमोनि शासकीय आश्रम शाळेच्या संघाच्या न्यू हायस्कूल तळोदा संघाने ८ विरुद्ध ३ ने पराभव केला .
यावेळी ज्येष्ठ लिपिक धंनजय कलाल क्रीडा शिक्षक निलेश सूर्यवंशी . पदमेश माळी. किशोर माळी. उपस्थित होते पंच म्हणून श्री निषाद माळी प्रवीण चौधरी यांनी काम पाहिले तर गुण लेखक म्हणून दिवेष पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजक तालुका क्रीडा संयोजक सुनिल सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक एस जी.वसावे यांनी केले होते . संस्थेचे अध्यक्ष मंगलाताई महाजन वरिष्ठ महाविद्यालचे संचालक अरुण महाजन शाळेचे प्राचार्य अजित टवाळे उपप्राचार्य प्रा.अमरदिप महाजन पर्यवेक्षक बी.जी.माळी. कार्यालयीन अधीक्षक डी . पी.महाले यांनी अभिनंदन केले आहे