अवैध साग व खैर 1 लाख 23 हजार 540 रु लाकूड साठा जप्त अक्रानी वनविभागाची कारवाई
अवैध सागव खैर एकूण 4.80 घनमीटर माल किंमत 96407/- व खैर एकूण 1.373 व माल किंमत 27133/- घनमीटर असा एकूण
1 लाख 23 हजार 540 रुपयांचा मुददेमाल लाकूड साठा जप्त केल्याची अक्रानी वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. अवैध लाकूड विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अवैध विक्रीच्या सागवान व खैर लाकूड गुप्त बातमीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी अक्राणी (प्रा.) व रेंज स्टॉप अक्राणी व ,बिलगाव रेंज स्टाफ सह माकडकुंड परीमंडळातील माकडकुंड नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 125 मधील नर्मदा नदीच्या लगत पौला गावाच्यापासून थोड्या अंतरावर अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने आणून ठेवलेल्या साग दांडी, साग बेलखे,खैर प्रजातीचे सालिसह व विनासालीसह घडतड केलेला बेवारस लाकूड साठा वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ताब्यात घेतला. यात साग एकूण 4.80 घनमीटर माल किंमत 96407/- व खैर एकूण 1.373 व माल किंमत 27133/- घनमीटर माल जप्त केला आहे.
असा एकूण 1 लाख 23 हजार 540 रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतल्याने लाकूडतस्कारांमध्ये भीती निर्माण झाली आहे . वन विभागाने नर्मदा नदी किनारी अतिशय दुर्गम भागात नर्मदा नदी मधून सदर माल बार्ज साह्याने पौला येथून नदीकिनारी वाहतूक करून पुन्हा खाजगी वाहनाने वाहतूक करून धडगाव टिंबर डेपोत जमा केला . सदरच्या गुन्हा हा वनरक्षक माकडकुंड यांनी प्र.री.क्र.01/2022 चा नोंदविला. सदर कार्यवाही धुळे (प्रा.) वनसंरक्षक दि.वा.पगार,नंदुरबार वनविभाग उपवनसंरक्षक के.बी.भवर, व सहाय्यक वनसंरक्षक अक्रानी (रोहयो.) एस.डी.साळुंके यांचा मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अक्रानी(प्रा.) सी.ए.काटे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल माकडकुंड बी .एम .परदेशी, वनपाल धडगाव एन. डी. पवार, वनरक्षक डी.एफ. पावरा, जी.बी .तडवी, आर .झेड. पावरा, ए .एस .पाडवी, एम एम. वळवी, एच.टी .तडवी, श्रीमती बी.के .वसावे व बिलगाव वनक्षेत्रातील वनरक्षक एस.बी.भंडारी,एम .एच.तडवी, पी.एफ. पाडवी, व्ही .जी .पटले, यु.सी .पावरा, अनिल पावरा, श्रीमती जे .आर. पावरा, एम .एन .पावरा, पी.जे.पावरा तसेच अक्रानी,व बिलगाव क्षेत्रातील वनमजूर जेरमा पटले ,बारदा पटले, ओरजी वळवी, मगन पटले, भिका पाडवी, दारख्या पटले, जयवंत पावरा, बिजला वळवी, खेमसिंग वसावे, खात्या पाडवी,शिवाजी पाडवी,संजय पराडके वाहन चालक हेमंत पावरा इत्यादींनी कारवाईत सहभाग घेतला असुन पुढिल तपास माकडकुंड वनपाल बी .एम .परदेशी हे करित आहे.