डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
नंदुरबार, दि.6 :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त साक्री नाका, नंदुरबार येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पुष्पहार अर्पण करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर आदी उपस्थित होते.