कौटूंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतांना जिद्द , परिश्रम व चिकाटीच्या भरोश्यावर निंगनुरचा युवक सैन्यदलात भरती !
प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निंगनुर : -
कौटूंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतांना जिद्द , परिश्रम व चिकाटीच्या भरोश्यावर निंगनुर येथील युवकाने आपली भारतिय सैन्यदलात भरती होण्याची इच्छा पूर्ण केली .
सचिन प्रभू भोळे या युवकाने भारतिय सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून भरतीपूर्व तयारी केल्यानंतर त्याची 27 नोव्हेंबर रोजी भरती झाली . बंदी भागात अशिक्षित कुटुंबातील शेतमजुरी करणाऱ्याचा मुलगा भारतिय सैन्यदलात भरती झाल्या बद्दल निंगनुर ग्राम पंचायतच्या वतिने त्याचा सत्कार करण्यात आला . यावेळीसचिव व्हि बी बोबडे सरपंच सुरेश बरडे, उपसरपंच महेमु निसाबेगम , माजी जि . प . सदस्य पंकज मुडे , जि. प चे माजी सभापती दादाराव गव्हाळे, माजी सरपंच बालाजी महाले , ग्रा पं . सदस्य प्रमोद जयस्वाल, बाबाराव पंडागळे, भारतसिंग ठाकूर , डॉ . सुनिल बरडे , डॉ. सुधिर तायडे, बालाजी मुडे , संदिप मुडे , इमरानखान यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते .तसेच गावात व परिसरात याचे कौतुक केले जात आहे