यारी दोस्ती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, मार्फत गरजूंना चादर वाटप
जव्हार प्रतिनिधी : दिनेश आंबेकर
यारी दोस्ती फाऊंडेशन कडून डहाणू तालुक्यातील चारोटीच्या परिसरातील यामध्ये चारोटी, सोनाळे, महालक्ष्मी, निकणे, रानशेत, घोळ, तलासरी, विक्रमगड अशा एकूण ३० गरजू बेघर, दिव्यांग तसेच गरजू मातांना चादरीचे वाटप करण्यात आले. या थंडीच्या दिवसांत घरा बाहेर राहून पूर्ण रात्र काढणे अशक्य असते यातच असे अनेक बेघर व्यक्ती आपण आजूबाजूला बघत असतो. तसेच अनेक दिव्यांग व्यक्ती आणि गरजू कुटुंब आहेत की एक चादर विकत घेवु शकत नाही. अशा कुटुंब आणि गरजू व्यक्ती यारी दोस्ती ग्रुप सदस्यांनी बघून त्यांना मदत करण्याचे ठरविले.
यारी दोस्ती ग्रुप मधील सदस्यांनी निस्वार्थ भावनेने सामाजिक कर्तव्य म्हणून निधी एकत्रित करून त्यातून चादरी खरेदी करून त्यांचा राहत्या ठिकाणी जावून त्यांना "माणुसकीची ऊब" म्हणून चादर वाटप केल्या. या मदती बद्दल यारी दोस्ती ग्रुप चे खूप खूप आभार मानण्यात आले.