रांझणी येथील कृषि विद्यालयात मृदा दिवस साजरा
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भिक्कन पाटील यांनी बोलतांना सांगितले की, प्रत्येक शेतकरी आपापल्या पद्धतीने शेतात रासायनिक द्रव्य टाकतात. अमर्यादित असा रासायनिक खताचा वापर शेतात होतो. त्यामुळे शेतजमीनीसाठी योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर, मृदेचे पोषक द्रव्य वाढवून जमिनीचे आरोग्य नियंत्रित, अबाधित ठेवण्याकरिता मृदा परीक्षण करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे मानवी रक्त चाचणीतून शरीरातील कमी जास्त असलेले विविध घटक तपासले जाते अगदी तसेच जमिनीला सुद्धा आरोग्य असून वेगवेगळे केमिकल्स वापरुन मृदा परिक्षणाच्या पद्धतीने जमिनीतील सेंद्रिय कर्ब किती प्रमाणात आहे हे तपासले जाते. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रीय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. अन्नद्रव्यांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. परिणामी पीक पोषणात असमतोलता निर्माण होऊन पीक उत्पादकता घटली आहे हे थांबवायचे असेल तर सेंद्रीय शेती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे सांगितले.
यावेळी भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, जितेंद्र वानखेडे व विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.