Excise-PSI पदी अमोल घुगे हे राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण
तालुका सेलू. MPSC ने नुकताच state Excise Sub-Inspector पदाचा निकाल जाहीर केला. शेतकरी कुटुंबातील अमोल घुगे वडीलच नाव संभाजी घुगे तर आई उर्मिला घुगे अमोल यांचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातील त्यांच्या गावी तळतुंबा येथे झाले. वडिलांचा पारंपारिक व्यवसाय शेती आहे पण मुलाला साहेब बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते व वर्षभर शेतात राबराब राबवले पण मुलाला शिक्षणाला काही कमी पडू दिले नाही बापाची मेहनत अखेर फळाला आली मुलगा शिकला नुसता शिकला नाही तर थेट Excise PSI राज्यातून तिसऱ्या क्रमांकांनी उत्तीर्ण झाला मोठा साहेब झाला त्यामुळे राब राब राबणाऱ्या हाताचे चीज झाले.
नुकतीच डायनामिक अभ्यासिका च्या वतीने त्यांचा सत्कार झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद चिकलठाणा शाळेचे मुख्याध्यापक श्री घुले सर तर प्रमुख पाहुणे श्री गजानन वाघमारे सर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सेलू तसेच मुख्य उपस्थिती गुलाब काटे सर ताठे कोचिंग क्लासेस सेलू.
तसेच गणाचार्य सर तुरकर सर भोसले सर सतीश जाधव (जालना पोलीस) शिवाजी चव्हाण (मुंबई पोलीस) राहुल तुरे (महाराष्ट्र ग्रामीण बँक) मारुती मगर (M.S.E.B) तसेच डायनामिक अभ्यासिका परिवारातील सर्व भावी अधिकारी विद्यार्थी मित्र उपस्थित होते