Type Here to Get Search Results !

स्व.सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय फुलसावंगी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा



स्व.सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय फुलसावंगी ता. माहागाव जि .यवतमाळ येते महापरिनिर्वाण दिन साजरा 

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलसावंगी येथील स्वर्गीय सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय फुलसावंगी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले होते. त्यामुळे ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौध्द पध्दतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले.




डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाअगोदर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांना लोक 'बोधिसत्व' मानतात. डॉ. बाबासाहे ब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतातून लक्षावधी लोक येतात व चैत्यभूमी ठेवलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात.




६ डिसेंबर या दिवशी जगभरातील सर्व आंबेडकरवादी व्यक्ती बाबासाहेबांची प्रतिमा व मूती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौध्द विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी शाळा महाविद्यालये, शासकीय कार्यालये इ. ठिकाणी महापरिनिर्वाण दिन या दिवशी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करतात. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा भीम अनुयायांसाठी अत्यंत खास असतो. ६ डिसेंबर हा दिवस देशभरातील भीम अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. भारताच्या इतिहासात दलित आणि बौद्ध धमीयांसाठी आपलं जीवन वेचणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी मोठा जनसागर उसळतो. ६ डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांचे निधन झाल्यानंतर महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जाण्यास सुरुवात झाली.




डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिवहन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. रितेश चंदेल ,अविनाश मुनेश्वर ,अंकुश कुसणेनिवार, भुजंग सूर्यवंशी ,बाळू आडे, गावंडे सर ,हिंगाडे सर, संदीप रठोडसर, पवार सर व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad