चांदवड येथे छत्रपती शंभुराजे परिवारातर्फे दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम आयोजित
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे दिं .11-12-2022 रविवार रोजी वारसा मराठा साम्राज्याचा वसा गडकोट संवर्धनाचा" हे ब्रिदवाक्य सार्थकी ठरवण्यासाठी आज किल्ले चांदवड येथे छत्रपती शंभुराजे परिवार नाशिक विभाग यांच्या वतीने आयोजित दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम क्रमांक २ राबविण्यात आली. श्री चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिर परिसरातील कचरा गोळा करणे, अतिप्राचीन बारव परिसरातील कचरा गोळा करणे तसेच टांकसाळ येथेदेखील स्वच्छता व दुर्गसंवर्धन केले आहे.
सदर मोहिमेसाठी चांदवड, देवळा, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, नाशिक, वैजापूर, संगमनेर, चाळीसगाव, नंदुरबार आदी ठिकाणावरून दुर्गसेवक आणि दूर्गसेविका सहभागी झालेल्या होत्या. दुर्गसेविकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन आणि दुर्गसंवर्धन मोहिमेसाठी लागनारे छत्रपती शंभूराजे परिवाराचे नवीन साहित्याचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी छत्रपती शंभुराजे परिवाराचे नाशिक जिल्हाध्यक्ष शिवव्याख्याते संदिप पवार यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मोहिमेचे मुख्य नियोजक दत्ता जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानुन मोहिमेची सांगता केली.
91 इंडिया न्युज साठी दादाजी हिरे देवळा