BCI प्रकल्पाच्या माध्यमातून आणि शेळी वाटप
तळोदा लुपिन हुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाऊंडेशन अंतर्गत चालत आलेल्या BCI प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापक सुनील शैंदाने व प्रशिक्षण समन्वयक कुर्षावत पाटिल, प्रकल्प समन्वयक दीपक जाधव व तळोदा पियु चे व्यवस्थापक अभंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
वंचित घटक व गरजू कुटुंबांना उपजिवीका उद्योग म्हणून अल्प सहभाग रक्कम घेवुन कुकटपलान आणि शेळी पालन वाटप करण्यात आले जेणेकरून या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत भेटेल आणि त्यांचा जीवनमान उंचावेल.
यावेळी कृषी मित्र:आसिम तेली, प्रताप वसावे, अजय चव्हाण, मनोज वसावे, हरिष खर्डे, प्रदीप पटले, विनोद डोंगरे, जीतेन्द्र वळवी, उमेश शिवदे, दिनेश कोते, ज्योती पाडवी, रेखा बागुल, लक्ष्मी पाडवी. आदीसह उपस्थित होते.