शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मिरढे येथील डिपी सुरु : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख
फलटण तालुक्यातील मिरढे गावातील शेतकरी गोपीचंद देवबा यादव यांची डिपी दीड महिन्यांपासुन बंद असलेबाबतची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे आली होती. तक्रारीनुसार अंदाजे दीड महिन्यांपासुन सदर डिपी बंद होता. त्यामुळे त्यांच्या शेतपीकाचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. सदर तक्रार आल्यानंतर शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी शिवसेना विभाग प्रमुख किसन यादव यांचेसह वीज वितरण उपविभागीय कार्यालयात जाऊन फलटण विभागाचे सह मुख्य अभियंता गणेश जमाले यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर माहिती देऊन तात्काळ डिपी बसवण्याची मागणी केली. त्यानुसार तात्काळ डिपी बसवण्यात आल्याची माहिती प्रदिप झणझणे यांनी दिली व फलटण विभागाचे सह मुख्य अभियंता गणेश जमाले यांचेही आभार व्यक्त केले.
शिवसेनेच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सदर डिपी तात्काळ बसवण्यात आल्याची माहिती शेतकरी गोपीचंद देवबा यादव यांचेकडुन मिळाल्याचे प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या माध्यमातून प्रदिप झणझणे मागील प्रदीर्घ कालावधीपासुन महावितरणच्या विरोधात फलटण तालुक्यातील शेतक-यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत व शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान असल्याची भावना फलटण तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.