Type Here to Get Search Results !

आश्रमशाळा वावर ता.जव्हार येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न



आश्रमशाळा वावर ता.जव्हार येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न


पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर


               रयत शिक्षण संस्थेचे,अध्यक्ष मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 वाढदिवसानिमित्त प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शाळा वावर येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करून आपल्या शाळेचा विद्यार्थी हा प्रत्यक्ष प्रयोग करून इतरांना माहिती कशी पोहचविता येईल आणि आपल्या ग्रामीण भागात याचा कशा उपयोग करता येईल म्हणून हा प्रदर्शन आयोजित करण्यात आला होता . 

     जि.प.सदस्या मनीषा बुधर,उपसरपंच श्री.रमेश बीज,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सखाराम बुधर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सविता गरेल आणि बेहेपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.खिरारी सर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मुलांचे कौतुक केले. तसेच परिसरातील शासकीय आश्रमशाळा वांगणी,जि.प.शाळा बेहेडगाव जि.प.शाळा चौकीपाडा,ब्राम्हणपाडा,चिकाडीपाडा या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या प्रदर्शनानिमित्त श्री.बर्डे सर,श्री.पवार सर,श्री.पाटील सर,श्री.कोल्हाळ सर विज्ञान शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री.गारुडकर सर,साळुंके सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.भामरे सर,निकुंभ सर,रणधीर सर,भामरे मॅडम,सावंत सर,ठाकरे सर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय राठोड यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad