शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उद्या जिल्हास्तरीय मेळावा.
तळोदा, ता. ३० नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय मेळावा उद्या शनिवारी (ता. ३१) दुपारी १ वाजता नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या महत्वपूर्ण मेळाव्याला सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले यांनी केले आहे.
या मेळाव्यात ८ जानेवारीला सांगली येथे होणाऱ्या शिक्षकेतर संघटनेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत तालुका निहाय नियोजन करण्याबाबत तसेच १०,२०,३० च्या सध्यास्थितीत आश्वाषित प्रगती योजनाबाबत विचार विनिमय करणेबाबत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा भरती बाबत, २४ वर्षांनंतर लागणाऱ्या आश्वाषित प्रगती योजनेच्या न्यायालयाचा निकाला बाबत तसेच ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत विचार विनिमय करणे अश्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच राज्य संघटनेकडून जिल्हा संघटना एकत्रिकरण झाल्यामुळे संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डी. पी. महाले, सचिव सैय्यद इसरार अली, कोषाध्यक्ष जयेश वाणी, उपाध्यक्ष जुबेरशेख मन्यार, माधव पाटील, महेंद्र सूर्यवंशी, रामा चव्हाण, मिना वसावे, प्रशांत पवार तसेच सर्व तालुकाध्यक्ष यांनी केले आहे.