मुरबाड ब्रेकिंग न्यूज
मुरबाड शिरवली येथील महिलेचा सव्वा तोळ्याचा सोन्याचा गडसूळ चोरांनी केला लंपास
सोन्याच्या बिस्किटाच्या लालचे पोटी महिलेने दिला आपल्या गळ्यातील सोन्याचा मंगळसूत्र चोराच्या स्वाधीन
मुरबाड दिनांक 30 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड तालुक्यात आज शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने सकाळपासूनच तालुक्यात ग्राहकांची बाजारासाठी गर्दी होती . या गर्दीचा फायदा घेत चोरांनी तालुक्यातील शिरवली येथील इंदुबाई शिरोशे या बाजार खरेदीसाठी आल्या असता मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठ आंबेडकर पुतल्यासमोर दैनंदिन वस्तू खरेदी करत असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्यासमोर आल्या व मावशी तुमची ही वस्तू खाली पडली आहे असे सांगत असताना तिच्या हातात नकली सोन्याचं बिस्किट देऊन तिला भूल टाकली असे त्या महिलेने आमच्या पत्रकाराशी बोलताना सांगितले
सोन्याच्या बिस्किटाच्या लाल चे पोटी सदर महिलेने आपल्या गळ्यातील सव्वा तोळ्याचा गडसोल त्या चोरांच्या स्वाधीन केला हा सर्व प्रकार घरी गेल्यावर आपल्या सुनेला सांगितल्यावर थेट मुरबाड पोलीस ठाणे गाठून झालेली हकीगत पोलिसांसमोर बयान केली असता सदर चोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने चोरांचा शोध चालू केला आहे तरी सदर घटना तालुक्यामध्ये वाढत असून महिलांनी खबरदारी घेण्याचे आव्हान मुरबाड पोलीस स्टेशन मधून करण्यात आले आहे