श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर विद्यार्थ्यांची क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांचा स्मरकास भेट
तळोदा :- शहरातील श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता 4 थी च्या वर्गाची अभ्यासक्रमांतर्गत क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांचा जीवन परिचय प्रत्यक्ष बस स्टँड परिसरातील स्मारकाचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी अनुभवला, प्रसंगी बिरसा मुंडा यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांना उजाळा देण्यात आला ,त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनपटाचा परिचय विद्यामंदिरातील शिक्षक सचिन पाटील, वर्गशिक्षक मुजगे यांनी करून दिला.
सदरील उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष निखीलभाई तूरखिया, उपाध्यक्ष- महाले आप्पा, सचिव संजय पटेल आदींनी कौतुक केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गणेश बेलेकर, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिपाई-विष्णू चित्रकथे, वाहन चालक धनराज राजपूत, विक्रम पाडवी, अजय भाऊ आदींनी परिश्रम घेतले.