Type Here to Get Search Results !

मल्लखांब खेळास आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी करण्यात यावे अशी मागणी तळोदा प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .



मल्लखांब खेळास आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी करण्यात यावे अशी मागणी तळोदा प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .


 या बाबत निवेदनात म्हटले आहे की प्रकल्प स्तरीय स्पर्धेत मल्लखांब खेळाचा समावेश करण्यात यावे




 मल्लखांब खेळामुळे कमीत-कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाचा जास्तीत-जास्त व्यायाम होतो. मल्लखांबचा खेळाचा समावेश राष्ट्रीय खेळ, खेलो इंडिया, शालेय स्पर्धा व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ही झालेले आहे. भारतीय ऑलम्पिक व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन ची मान्यता आहे. मल्लखांब खेळाला शासकीय, निमशासकीय नोकरीत ५% आरक्षण ही लागू आहे. नंदुरबार जिल्ह्यात मल्लखांब खेळ हा आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आमलाड येथे २० पेक्षा जास्त मुल प्रशिक्षण घेत आहे. के. आर. पब्लिक स्कुल नंदुरबार, के.डी.गावित, सैनिकी विद्यालय पथराई, बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमी सोरापाडा येथे मल्लखांबचे नियमित प्रशिक्षण चालू आहे व दि.०५ मे ते २५ मे २०२२ या कालावधीत क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व विविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांब खेळाच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबीर २०२२ मध्ये आदिवासी मुलाच्या वसतिगृहातुन व बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमीतून १४३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला व प्रशिक्षण घेतले. मल्लखांब खेळ ३५ हुन अधिक देशात खेळला जात आहे. असे मुलांचे फायदे पाहुन प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृह शाळेत मल्लखांब खेळाचे साहित्य उपलब्ध करुन शिबीरे घेऊन मुल्लखांब खेळाच प्रशिक्षण देण्यात यावे. आदिवासी तरुण हे काटक शरीरयष्टीचे असून त्यांना या क्रीडा प्रकाराबद्दल शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले तर त्याच्यातुनही अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडू शकतात. मल्लखांब खेळाच्या समावेश प्रकल्प स्तरीय स्पर्धेत करण्यात यावा व आश्रमशाळेत, वसतिगृहात शाळेत साहित्य उपलब्ध करुन नियमित प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे




"मल्लखांब सारखे अनेक खेळांना प्रकल्प स्तरीय स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले तर नक्कीच आदिवासी समातील मुला मुलींना खेळा कडे भविष्य म्हणून पाहण्यात हरकत राहणार नाही व खेळात चागली संदी उपलब्ध होईल


-अनमोल पाडवी आदिवासी रत्न पुरस्कार प्राप्त व मल्लखांब खेळाडू प्रशिक्षक" बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमी सोरापाडा सचिव


*" प्रकल्प स्तरीय स्पर्धेत मल्लखांब सारखे खेळांचा समावेश झाला तर नक्कीच आदिवासी समाजातून व सातपुडा परिसरातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील व या खेळा कडे कल म्हणून पाहतील 


-डिगंबर नाईक अध्यक्ष जित कुने डो असोसिएशन"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad