Type Here to Get Search Results !

धडक मोर्चा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुख्यालय सोडण्याची परवानगी मिळवी अशी मागणी



धडक मोर्चा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुख्यालय सोडण्याची परवानगी मिळवी अशी मागणी


नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दि.28 डिसेंबर रोजी होणाऱ्या धडक मोर्चा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुख्यालय सोडण्याची परवानगी मिळवी अशी मागणी तळोदा तहसीलदार यांना तळोदा तालुका कोतवाल संघटना यांनी  निवेदनात केली आहे.

 याबाबत निवेदन सादर करतो की, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने विविध मागण्या संदर्भात राज्य शासनास निवेदन सादर केलेले असून दि.27डिसेंबर पर्यंत खालील प्रमाणे मागण्या मंजूर न झाल्यास दि. 28 डिसेंबर रोजी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात धडक मोर्चा नेण्यात येणार आहे. प्रमुख मागण्या

कोतवाल संवर्गाकरीता चतुर्थ श्रेणी विचाराधिन ठेवून सद्यास्थितीत किमान वेतन लागू करण्याबाबत तसेच किमान वेतन प्रक्रिया शासनस्तरावर पूर्ण होई पर्यंत कोतवालांचे मानधनात सरसकट वाट करून


सर्वांना समान काम समान वेतन या धर्तीवर 15000/-रूपये मानधान लागु करणे बाबत 21 तलाठी व तत्सम पदामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी धर्तीवर आरक्षण लागू करण्याबाबत कोरोनामुळे मयत कोतवाल यांचे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या वारसांना समावुन घेण्याबाबत

संदर्भ- अनुकंपा नियुक्तीचे धोरण गट अ व गट ब मधील शासकीय कर्मचान्याना लागू केल्याप्रमाणे (शासन निर्णय दि. 27 सप्टेंबर 2021

 सेवानिवृत्त कोतवाल यांना निर्वाह भत्ता देणे बाबत  कोतवालांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करण्यात यावे,


उपरोक्त मागण्या मोठ्या कालावधीपासून शासन स्तरावर प्रलंबित आहे या कारणास्तव राज्यातील कोतवाल सदरच्या मागण्या दि. 27 डिसेंबर पर्यंत मंजूर न झाल्यास दि.28 डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्य) कोतवाल संघटने मार्फत नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा आणणार असून सदरचे धडक मोर्च्यांत तळोदा तालुका कोतवाल संघटना सहभागी होणार असल्याने तळोदा तालुक्यातील सर्व कोतवालांना नागपुर येथील हिवाळी अधिवेशनातील मोर्चात सहभागी होणेकामी दि.27/12/2022 से 29/12/2022 पर्यंत मुख्यालय सोडणेची परवानगी मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदनावर अध्यक्ष

रावण मान्या ठाकरे

उपाध्यक्ष राजेंद्र शिरसाठ सचिव योगेश बेडसे व कोतवालांच्या सह्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad