Type Here to Get Search Results !

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रारूप विकास आरखड्यासंबधित विषय सर्वानुमते नामंजूर



पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रारूप विकास आरखड्यासंबधित विषय सर्वानुमते नामंजूर

तळोदा: शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त

तळोदा : नगरपालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा आज पालिकेच्या सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सर्वसाधारण सभेत प्रारूप विकास आराखड्यासंबंधी वादग्रस्त दोन विषय नामंजूर करण्यात आले असून व इतर उर्वरित चार विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आले.दरम्यान,सर्वसाधारण सभे प्रसंगी नगरपालिकेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

         या बैठकीला नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या समवेत उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रतोत संजय माळी,बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,सुनयना उदासी,नगरसेवक सुभाष चौधरी,गौरव वाणी,जितेंद्र सूर्यवंशी,हेमलाल मगरे,रामानंद ठाकरे,सुरेश पाडवी,योगेश पाडवी,भास्कर मराठे,अमनोद्दिन शेख, नगरसेविका अनिता परदेशी,अंबिका शेंडे,शोभा भोई,बेबीबाई पाडवी,कल्पना पाडवी,सविता पाडवी, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा आदी उपस्थित होते.

            बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच पालिकेच्या आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली बैठक सुरू होण्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना निवेदन देऊन नवीन प्रारूप विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू नये या मागणीसाठी निवेदन दिले. निवेदन स्वीकारताना नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी बैठकी सुरू होण्यापूर्वीच यासंबंधी अजेंडावर असणारे दोन्ही विषयी नामंजूर करण्यात आली असल्याची माहिती निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना दिली.

           पालिकेच्या या शेवटच्या सर्वसाधारण सभेत तळोदा शहरातील हातोडा रस्त्यावरील मेन रोड श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर खान्देशी गल्ली लगत असणारी मुतारी हटविणे, भोई गल्लीत भोई समाज सामाजिक सभागृह बांधणे, नगरपालिका मालकीचे जेष्ठ नागरिक हॉल जेष्ठ नागरिकांत वापरासाठी खुले करणे या विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

     बैठकीला सुरुवात बैठकीच्या सुरुवातीला नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी बैठकीला केले. शहरात मागील पाच वर्षाचा कार्यकाळात अनेक विकास कामे करण्याचा प्रयत्न केला काही भागात विकास कामे राहिली असतील असे सांगून पालिकेतील सर्व नगरसेवकांचे व पालिका कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल सर्वांचे आभार मानले नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबर कोरोना काळात देखील चांगले कार्य करण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने केला असल्याचे ते म्हणाले. शहर विकासासाठी 30 कोटीच्या निधी मंजूर झाला असून 25 कोटी हा डी पी रस्त्यासाठी असून पुढील दोन दिवसात शहरातील मेन रोडचे देखील उद्घाटन होईल व निवडणुकांपूर्वी शहरात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती देखिल त्यांनी दिली.स्वीकृत नगरसेवक हे मला बैठकीत बोलताना त्यांच्या प्रभागात बोटांमध्ये एवढी काम झाल्याबाबत खंत व नाराजी व्यक्त करून दाखवली.

          नगरपालिकेचे शेवटचे सर्वसाधारण नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या कार्यकाळ संपत असल्याने पालिका प्रशासनाच्यावतीने नगरसेवकांच्या सत्कार करण्यात आला.बैठकीच्या यशस्वीतेसाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र माळी, लेखापाल विशाल माळी,संगणक अभियंता सचिन पाटील कर निरीक्षक राजेश पाडवी नगर रचनाकार बिपिन काबरा,गौरव चौधरी,लिपिक नितीन शिरसाट,मोहन माळी सुनील माळी,युगश्री पाडवी,जयश्री मगरे,आकाश हसे,यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News