गेली १३ दिवस माहुर तहसिल येथे लाल बावटा, किसान सभेच्या नेतृत्वात देवस्थान जमिनीच्या प्रश्नासाठी चालेल्या ऐतिहासिक आंदोलनाची यशस्वी सांगता आज करण्यात आली
२३ नोव्हेंबर पासुन सुरु झालेल्या अांदोलनाची दखल घेऊन मा.जिल्हाधिकारी यांनी आज बैठक बोलवली होती. ७ अ आणि ७ ब ची कार्यवाही करुन अनुदान वाटप करा हि प्रमुख मागणी आंदोलनाची होती. सकारात्मक निर्णय घेऊन अनुदान वाटपा करु तथा ९ डिसेबंर रोजी देवस्थान विश्वस्त संस्थान दत्त शिखर माहुर ,तहसीलदार माहुर यांची बैठक घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी आज बोलवलेल्या किसान सभा तथा देवस्थान संघर्ष समिती च्या बैठकीस दिले. गेली १३ दिवस १७ गावे, ७०० कुटुंबांच्या हक्काच्या १० हजार एकर च्यावर जमिनीचा अधिकाराचा संंघर्ष आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आंदोलनाचे नेतृत्व काॅ.अर्जुन आडे ,काॅ.शंकर सिडाम,काॅ.किशोर पवार,काॅ.प्रल्हाद चव्हाण, काॅ.अमोल आडे,काॅ.प्रफुल कवुडकर,काॅ.वंसत राठोड. तथा देवस्थान जमिन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण, किसन जगदाळे,मनोज किर्तिने,गणेश जाधव आदिनी केले.आंदोलनाला पांठिबा देणाऱ्या सर्व संघटना, राजकीय पक्ष,व्यक्तीचे आभार।
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव