Type Here to Get Search Results !

तळोदा शहरातील हुतात्मा चौकात सार्वजनिक मुतारीची योग्य व्यवस्था करावी मनसेचे नगर परिषदेला निवेदन



तळोदा शहरातील हुतात्मा चौकात सार्वजनिक मुतारीची योग्य व्यवस्था करावी मनसेचे नगर परिषदेला निवेदन 



तळोदा:- शहरातील हुतात्मा चौकात सार्वजनिक मुतारीची योग्य व्यवस्था जनहितार्थ उपयोगासाठी करून मिळणेबाबत व नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी दुर करणेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांना निवेदन देण्यात आले.




निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष, जनप्रतिनिधी व स्वतः तळोदा शहराचा नागरिक या नात्याने विनंती करितो की, तळोदा शहराला सुदैवाने ब्रिटीशकालीन व सुसंचालित नगर परिषद मिळाली आहे, जी गेल्या कित्येक दशकापासून शहराचा सोयी सुविधा, लोक कल्याण योजना परियोजना) शहरवासीयां पर्यंत पोहचविण्याचे कार्य करित आहे.


हा अर्ज देण्यामागचे मुख्य कारण नागरिकांना होणारी गैरसोय संबंधित विभागाचे दुर्लक्ष व निष्काळजीपणा तसेच योग्य व्यवस्थापणाचा अभाव. गैरसोय हा संदर्भ सरळ सार्वजनिक मुतारी व त्यासोबत जुळलेल्या पर्यायी व्यवस्थांशी आम्ही करतो.

शहरातील हुतात्मा चौक ही जागा मुख्यतः तालुक्याचे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक व्यापारी वर्ग, रोजंदारीवर काम करणारा मजुर व कामगार वर्ग, सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालये व प्रतिष्ठान कार्यकत आहेत. त्यामुळे ह्या भागात नेहमीच लगतचा परिसरातील खेड्या-पाड्यावरचे, शहरातले विद्यार्थी-विद्यार्थीनी व नागरिक बाजारपेठ व इतर कामांसाठी या परिसरात असतात. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना नागरिकांना, कामगारांना लघुशंका आली तर मुत्र विसर्जनासाठी नेमके कोठे जावे ? कोणाला विचारावे ? कोठे मुतारी मिळेल ? यासारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागते व त्याचे काही उत्तर नाही. कारण या भागात मुतारीची व्यवस्थाच नाही. जेणेकरून नागरिक इकडे तिकडे आडोसा घेवून लघुशंका करित असतात आणि हे निव्वळ चुकीचे आहे.

ऐकीकडे आपण सारखे एकत असतो एक कदम स्वच्छता की और परंतू व्यवस्थांचा अभावामुळे नाईलाजास्तव लोकांना तसे वागावे लागते, जर आम जनतेला लघुशंकेसारख्या समस्येला योग्य जागा द व्यवस्थेसाठी पर्यायच मिळत नसेल तर भोळ्या जनतेचे नेमके काय करावे ? नागरिकांना जर त्याचा मुलभूत हक्कासाठी तेही सार्वजनिक मुतारी सारख्या विषयावर एकत्र होवून नगर परिषदेला अर्जाद्वारे माहिती द्यावी लागत असेल, तर संबंधीत विभागाचे कर्मचारी व अधिकारी कोठे आहेत ? व त्यांना हे का दिसत नाही ? प्रशासन कोठे आहे ? ही अशी लापरवाही कशाला ? त्याचे नेमके निदान कधी होणार ?


या अर्जाद्वारे मी आपणांस विनंती करितो की, हुतात्मा चौक, तळोदा या भागात उत्तम दर्जाची सार्वजनिक मुतारीची योग्य सोय आम जनतेसाठी त्वरीत करण्यात यावी. जेणेकरून नागरिकांना व परिसरातील लोकांना होणारा शारिरीक त्रास, मानसिक त्रास कमी होईल.


एक कदम स्वच्छता की और हे फक्त ब्रिद वाक्य नसुन त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी, मुतारीची योग्य व्यवस्था आम जनतेसाठी व्हायलाच हवी आणि लोकांना होणार त्रास कमी होईल यावर नगरपरिषदेने आत्मचिंतन करायला हवे


आम्ही या स्वाक्षरी अभियानांतर्गत आपणांस हाच संदेश देवू इच्छितो की लोकांचे लोकांसाठी समर्पित असावे/ व्हावे अशी आशा आम्ही बाळगतो की नगर परिषद या अर्जाचा विचार गांभीर्याने करेल व योग्य निदान लोकांचा हितार्थ लवकर घेईल निवेदनांवर मनसेचे तालुकाध्यक्ष विपुल राणे शहराध्यक्ष उपाध्यक्ष सुधाकर माळी, उपशहराध्यक्ष किरण माळी, भूषण कलाल, कैलास चव्हाण, नचिकेत पिंपरे, जगदीश बच्छाव, मुन्ना पटेल दीपेश परदेशी, वासुदेव शिंपी, मनोज बिरारे, विजय परदेशी, दीपक मराठे, भगवान हिवरे, पुनमचंद सजनकार, हिरालाल महाले आदींसह हुतात्मा चौकातील व्यावसायिकांची व नागरिकांच्या सह्या आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad