Type Here to Get Search Results !

उद्या 8 वाजल्या पासून तहसिलमधे 12 टेबलवर होणार ग्राम पंचायत निवडणूकीची मतमोजणी



उद्या 8 वाजल्या पासून तहसिलमधे 12 टेबलवर होणार ग्राम पंचायत निवडणूकीची मतमोजणी


किनवट : येथील तहसिल कार्यालयाच्या मतमोजणी कक्षात मंगळवारी (दि. 20 ) सकाळी 8 वाजतापासून 12 टेबलवर 13 फेऱ्यात  ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दिली.

           तालुक्यातील 146 मतदान केंद्रावर 50 ग्राम पंचायती करिता निवडणूक लढविलेल्या सरपंच पदाच्या 137 व सदस्य पदाच्या एकूण 722 उमेदवारांचं भवितव्य 146 मतदान यंत्रातून ठरणार आहे. तालुक्यातील 21105 पुरुष मतदार, 19316 स्त्री मतदार व 01 असे एकुण मतदार 40422 होते. यापैकी 17562 पुरुष व 15687  स्त्री अशा एकूण 82.25 % मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

         मतमोजणीच्या तहसिलदार यांच्या कक्षाकरिता अव्वल कारकून अशोक कांबळे, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, मल्लिकार्जून स्वामी, नितीन शिंदे, संदीप पाटील, वाय.एम. देवकते, वाय.बी. इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांच्या नेतृत्वात व्ही.टी. सूर्यवंशी , एन.जी. कानगुले, विश्वास फड हे स्ट्रॉंगरूम मधून मतमोजणीकरिता  146 नियंत्रण संच व 193 मतदान संच उपलब्ध करून देतील. मंडळ अधिकारी एम. डी. वांगीकर व दाऊदखान हे रोऑफिसर मतमोजणी पर्यवेक्षकांकडून नोंदवलेल्या मतांचा हिशोब भाग 2 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे पोहचवतील. 

        उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना दुर्गा मैदानाकडील प्रवेश द्वारातून पासेस घेऊनच मतमोजणी कक्षात  प्रवेश करता येईल. मतमोजणी प्रक्रिया शांतपणे सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतमोजणी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त असणार आहे. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, मास्टर ट्रेनर, मंडळ अधिकारी, तलाठी, वाहन चालक, कोतवाल व शिपाई हे मतमोजणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहे.

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad