जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक 21 डिसेंबर रोजी
शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक 21 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.