तळोदा तालुक्यातील एक ग्रामपंचायतींसाठी सुमारे 84.85 टक्के मतदान झाले असून शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.
राजविहिर या एका गावामध्ये गाव कारभारी निवडण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.त्यात सरपंच पदासाठी 2 तर सदस्यपदाचा 9 जागांसाठी 18 उमेदवार निवडूकीचा रिंगणात होते.निवडणूकित 751 स्त्री तर 739 पुरुष मतदारांनी मतदानाच्या हक्क बजावला. त्यात एकूण 17 हजार 56 मतदारांपैकी 1 हजार 490 मतदारांनी मतदानाच्या हक्क बजावला.त्याची टक्केवारी सुमारे 84.85 आहे.
20 ला मतमोजणी.
दरम्यान तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी ला तहसील कार्यालयात होणार असून सकाळी दहा वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.यावेळी मतमोजणीसाठी एकूण तीन टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक टेबलावर निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक असे तीन व्यक्ती राहणार आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार तथा गिरीश वखारे यांनी दिली.