अनुदानित आश्रमशाळा तलावडी येथिल खेळाडू विद्यार्थ्यांचे घवघवित यश
तळोदा तालुक्यातील तलावडी येथील अनुदानित आश्रमशाळा येथिल खेळाडू विद्यार्थ्यांचे घव घवित यश 17 वर्षातील मुलींचा खो - खो संघ शालेय जिल्हा स्तरीय खो - खो स्पर्धेत विजयी होऊन विभाग स्तरावर निवड करण्यात आली.
पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ संचलित, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा,तलावडी येथील विद्यार्थिनीनी खांडबारा येथे झालेल्या जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत नवापूर तालुक्याला अंतिम सामन्यात हरवत विभाग स्तरवर निवड निश्चित केली.तरी सर्व क्रीडा नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांनी विशेष कौतुक केले आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजीवन पवार व अधीक्षक पी आर. वसावे यांनी अभिनंदन केले आहे. या खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक अमोल पाटील तसेच दिलीप पाटील, बबिता गावित, काश्मिरा पाटील, धनश्री आजगे, साईनाथ वळवी, दशरथ पाडवी, नीता पावरा , अलका तिडके इत्यादींनी परिश्रम घेतले.