गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीसांची कारवाई, 48 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त
नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे खूप संवेदनशील असून गांजा, अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक, विक्री व लागवड यांचेवर कारवाई करणेसाठी त्याबाबतची माहिती घेत होते.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला एक इसम बेकायदेशीररीत्या गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे पथकाने नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचला दिनांक 11/12/2022 रोजी सायंकाळी सुमारे 16.45 वा. सुमारास नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरातून कंजरवाडा भागाकडे पायी पायी एक 19 ते 20 वर्ष अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला वयाचा इसम जातांना दिसला, म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे पथकाला संशय आल्याने त्यास थांबवून त्याचे नाव विचारले असता सागर रविंद्र श्रीष्ट वय 19 रा. गौतम नगर, रेल्वे कॉलनी, नंदुरबार असे सांगितले.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे पथकाने सागर श्रीष्ट याच्या पाठीवर असलेल्या बॅगची पाहणी केली असता त्यात खाकी रंगाचे प्लॅस्टीकचेमध्ये गुंडाळलेले पाच पाकीट आढळून आले. सदरचे प्लॅस्टीकचे पाकीट उघडून पाहिले असता त्यात 48,000/- रुपये किमतीचा 03 किलो 200 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा मिळुन आल्याने गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन सागर रविंद्र श्रीष्ट वय 19 रा. गौतम नगर, रेल्वे कॉलनी, नंदुरबार व मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच ताब्यात घेण्यात आलेला सागर श्रीष्ट यास गांजाबाबत विशवासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गांजा भु-या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे, वय 23 वर्षे, रा. सरोजनगर, नंदुरबार याचेकडून घेतल्याचे सांगीतले भु-या याचा शोध घेतला असता तो सरोजनगर भागात मिळुन आल्याने 1) आरोपी सागर रविंद्र श्रीष्ट वय 19 रा. गौतम नगर, रेल्वे कॉलनी, नंदुरबार 2) भु-या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे, वय 23 वर्षे, रा. सरोजनगर, नंदुरबार यांचेविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 771/2022 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर, पोलीस हवालदार संदीप गोसावी, जगदीश पवार, पोलीस नाईक भटू धनगर, स्वप्निल शिरसाठ, बलविंद्र ईशी, स्वप्निल पगारे पोलीस अंमलदार हेमंत बारी, योगेश जाधव, इम्रान खाटीक, युवराज राठोड, विशाल मराठे, दिनेश चव्हाण, कल्पेश रामटके यांचे पथकाने केली असुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.