Type Here to Get Search Results !

लोककलेतून प्रभुनामाच्या गजर करणाऱ्या वासुदेवाचे तळोदा परिसरात आगमन



लोककलेतून प्रभुनामाच्या गजर करणाऱ्या वासुदेवाचे तळोदा परिसरात आगमन


भल्या सकाळी प्रभू नामाचे गोडवे गात लोकगीतातून हरिनामाचा गजर करत पारंपारिक लोकगीते गुंजन करीत मधुर आवाजात भक्ती गीते गाणाऱ्या वसुदेवाचे तळोदा परिसरात आगमन झाले आहे,




जुन्या काळात दरवर्षी वासुदेव हा घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात प्रभू नामाची लोकगीते व त्यातून घरधनीसाठी त्याच्या कुटुंबासाठी परमेश्वराचे आशीर्वाद मागत असतो असे कुळचा उद्धार व्हावा व दानातून पुण्यकार्य केल्याचे समाधान लावावे यासाठी वासुदेवाला घरोघरी धान्य व दक्षिणा भेट स्वरूपात दिली जात असे मात्र आधुनिक काळात ही संस्कृती लोपपावत चालली आहे ग्रामीण भागात मात्र पर जिल्ह्यातून येणाऱ्या व वंशपरपरागत हा भिक्षुकीच्या व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन होत असते अशाच एका वासुदेवाचे दर्शन तळोदा परिसरात सध्या होताना दिसत आहे अकोला जिल्ह्यातील पांडुरंग शिंदे नावाच्या वासुदेव सध्या हरिनामाचे गोडवे घात तळोदा परिसरात घरोघरी गल्लोगल्ली भिक्षुकी मागत फिरताना दिसत आहे सदर वासुदेवाची संवाद साधला असता त्याने सांगितले की सदर वसुदेव बनून भिक्षुकी चे काम तो वयाच्या दहाव्या वर्षापासून करीत आहे आज त्याचे वय साठ वर्षे आहे आयुष्याचे 50 वर्षे वंशपरंपरागत आजोबांकडून मिळालेल्या या भिक्षुकीचे व्यवसायाला झाली आहे.



वासुदेव गृहलक्ष्मीच्या हातून मिळणाऱ्या सुपातून देण्यात येणाऱ्या बहु तांदूळ व दक्षिणा रुपी थोडेफार रोख रक्कम याच्यावर समाधान मानतो व तेच दक्षिणेतून मिळालेले धान्य व पाण्याच्या कळस सुपात ठेवुन स्वतःभोवती गोल रिंगण मारून फिरवितो मात्र आश्चर्य असे की सुपातील धान्याच्या एक कणही तसुभर देखील इकडे तिकडे सरकत नाही अथवा तांब्यातील कळसातील पाणी डबकत सुद्धा नाही सुपात ठेवलेल्या कुंकवाच्या करंडातील तांदळाच्या दाणा देखील तसूभर सरकत नाही असे वैशिष्ट्य पूर्ण कलेचे दर्शन या वासुदेव कडून जनतेला होत असते याबाबत त्यांना विचारले असता हे सर्व आपण आपल्या आजोबांकडून शिकलो असल्याचे पांडुरंग शिंदे यांनी सांगितले अकोला येथून नंदुरबार जिल्ह्यात येऊन सदर भिक्षुकीच्या व्यवसाय करीत असून दररोज सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत देवाचे गोडवे गात गल्लोगल्ली भिक्षा मागण्याच्या व्यवसाय आपण करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले




सुपात धान्य व पानाच्या कळस कुंकवाचा करंडा ठेवून स्वतः भोवती प्रदक्षिणा घालत असताना सूप उभे धरून सदर प्रदक्षिणा घालत असताना सुपातले जिन्नस धान्य तसूवरही हरकत नाही यामागे रहस्य काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की हे मी माझ्या आजोबांकडून वंशपरंपरागत ही कला शिकलेलो असून ही कलाच आमची साधना आहे असे त्यांनी यावेळी सांगितले

--- पांडुरंग शिंदे (वासुदेव)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad