तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !
धर्माचरण आणि साधनेने हिंदु राष्ट्राची स्थापना होणार ! - सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
भारत देश पूर्वी आर्थिकदृष्ट्या सक्षम होता. विश्वाला मार्गदर्शन करत होता.
त्याकाळी मंदिरे ही चैतन्याचे स्रोत होते. आज मात्र परिस्थिती पालटलेली दिसते. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण चालू आहे. हिंदुत्वनिष्ठ, साधू यांच्या हत्या होत आहेत.
अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनासाठी स्वतंत्र अल्पसंख्यांक आयोग, मंत्रालय यांची स्थापना होत आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंसाठी कोणताही आयोग, मंत्रालय नाही. भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्व असतांना हा दूजाभाव कशासाठी ? छ्त्रपती शिवाजी महाराजांनी माता जगदंबेच्या कृपाशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे आपणही धर्माचरण आणि साधना केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. म्हणून प्रत्येकाने धर्माचरण करून साधना करूया, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी केले.
जिल्ह्यातील तळोदा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता माळी समाज मंगल कार्यालयात "हिंदु राष्ट्र जागृती सभा" पार पडली. दीपप्रज्वलन आणि वेदमंत्र पठणाने सभेला प्रारंभ झाला. या सभेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छ्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, समितीच्या नंदुरबार जिल्हा समन्वयक कु. रागेश्री देशपांडे यांनी संबोधित केले. सभेला ३ सहस्रहून अधिक हिंदूंची उपस्थिती लाभली.
माता भगिनींनो, स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हा !
हिंदु धर्मात प्राचीन काळापासून स्री ला पूजनीय मानले जाते. मैत्रेय, गार्गी, ब्रह्मपुत्रा, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी चेनम्मा अशा पराक्रमी स्रियांनी धर्मज्योत तेवत ठेवली. आज मात्र महिलांची स्थिती कशी आहे ? महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे.
वर्ष 2021 ला बलात्काराच्या 31677 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक युवती लव्ह जिहाद, धर्मांतरण यात अडकत आहेत. बॉलिवूड या लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे. हे थांबवायचे असेल तर महिलांनी स्वतः स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कु. रागेश्री देशपांडे यांनी केले.