शालेय विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धेत नाशिक विजेता व नंदुरबार उपविजेता
नाशिक:- विभागीय खो खो 17 वर्ष वयोगट क्रीडा स्पर्धा दि.18 डिसेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत नाशिक(मनपा),नाशिक(ग्रामीण), नंदुरबार,धुळे(मनपा),धुळे(ग्रामीण), जळगाव,मालेगाव असे एकूण 7 जिल्हास्तरीय खो-खो विजयी संघ सहभागी झाले होते.या सर्व संघांना मागे टाकत विभागीय अंतिम सामना नाशिक विरुद्ध नंदुरबार यांच्यात झाला,
या सामन्यात नाशिक विजेता संघ व नंदुरबार उपविजेता संघ ठरला.नंदुरबार चा संघ शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अमोनी ता.तळोदा येथील तर नाशिक चा संघ अनुदानित आश्रमशाळा अलंगून ता.कळवण येथील होता,दोन्ही संघांनी अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारली त्याबद्दल दोन्ही संघांचे विभागीय क्रीडा समन्वयक यांनी कौतुक केले.