Type Here to Get Search Results !

दाभाडपाड्यातील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण



दाभाडपाड्यातील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण


भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दाभाड पाडा या आदिवासी पाड्यातील नागरिकांना मागील अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी वण वण करावी लागत आहे ग्रामपंचायतीकडून पाड्यात बोअरवेल,नळ कनेक्शन्स देऊन सुद्धा मागील अनेक महिन्यांपासून या ठिकाणी पाणी येत नसल्याने हातातील काम सोडून महिलांना पाणी भरण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास करावा लागतो व या ठिकाणी असलेल्या अनेक कारखान्यांमधून सुद्धा पाणी भरावे लागते स्थानिक ग्रामपंचायतीकडून मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची दखल घेतली जात नसल्याने या ठिकाणच्या आदिवासी महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.




तर या दाभाडपाड्यामध्ये जवळपास 300 हून अधिक नागरीक राहत असून या नागरिकांना पाण्यासाठी दारोदारी भटकावं लागत आहे आदिवासी असल्याने या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप सुद्धा या आदिवासी महिलांनी केला आहे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या आदिवासी पाड्यावर पाण्यासाठी सरकारकडून विविध योजना अंतर्गत बोअरवेल व नळ बसवण्यात आली परंतु त्या बोरवेल मध्ये नळांमध्ये पाणीच येत नसल्याची माहिती या आदिवासी महिलांनी दिली आहे फक्त शासनाचा निधी लाटण्यासाठी या सुविधा बनविण्यात आल्याचा आरोप सुद्धा या नागरिकाने केला आहे या ठिकाणी आजपर्यंत शौचालय सुद्धा बांधण्यात आले नसल्याची माहिती सुद्धा देण्यात आली. ग्रामपंचायतीचे सदस्य याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा येथे स्थानिक आदिवासी महिलांनी केला आहे वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायती आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध होऊ नये ठेकेदार नेमण्यावरून अनेक कामे या पाढ्यातील अडकून पडले असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे या ठिकाणच्या आदिवासी महिलांना व शालेय विद्यार्थिनींना शौचालयासाठी सुद्धा व्यवस्था नसल्याने रात्रीच्या अंधारात जंगलामध्ये जावं लागतं या ठिकाणी सापांची सुद्धा भीती असल्याने पाड्यातील शौचालय लवकरात लवकर बांधण्याची मागणी सुद्धा या नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad