दहा वारकरी संघटना प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट-ह भ प श्री गणेश महाराज शेटे
देवी देवता संत महानता बद्दल अपशब्द बोलनाऱ्यावर कठोर कारवाई करणार, वारकऱ्यांचा सेवे करता सदैव तत्पर आहोत - मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
नागपूर येथे मुख्यमंत्री साहेब यांचे निवासस्थान रामगिरी बंगल्यावर धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह भ प अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व गणेश महाराज शेटे व इतर दहा वारकरी संघटनेचे पदाधिकारी यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली यामध्ये वारकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना वारकरी फेटा बांधून विना व श्री गजानन विजय ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला व सर्व वारकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महापुरुषांवर, देवी देवतांवर, संत महंतावर गरड ओकत असल्यामुळे काही धार्मिक संघटना, राजकीय पक्ष, आपापल्या परीने निषेध, मोर्चा, आंदोलने करीत असताना दिसत आहे. त्यामध्ये आम्ही वारकरी मंडळी सुद्धा सहभागी आहोत. महापुरुषांचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला व देवी देवतांच्या, संतमंडळीच्या बद्दल अपशब्द बोलल्याचे सुषमा अंधारे याचे व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळे आम्ही सुषमा अंधारे या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे
तरी आम्ही सर्व वारकरी संघटनेच्या वतीने आपणास विनंती करतो कि, चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये असा कायदा पारित करावा कि, यापुढे महापुरुषांबद्दल आणि कुठल्याही धर्मातील देवी देवतांबद्दल अपशब्द वापरल्यास त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी. आणि लव्ह जिहाद सारख्या प्रकरणाला आळा बसण्याकरिता एक कायदा पारित करण्यात यावा. छ. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढून द्यावे. व सुषमा अंधारे यांनी देवी देवता, संत मंडळी यांच्याबद्दल धार्मिक भावना दुखावतील असे विधान केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. परंतु अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. व जनतेने सर्व पक्षातील राजकीय मंडळींना महाराष्ट्राचा विकास जनतेच्या समस्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव असे बरेच विषय आहेत कि त्याकरिता त्यांना निवडून दिलेले आहे म्हणून आपण स्वतः विधी मंडळात सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना समाज द्यावा कि महापुरुषांवर, देवी देवतांवर टीका केल्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष द्यावे. हि आपणास नम्रविनंती.
याप्रसंगी उपस्थित महाराज मंडळी.गणेश महाराज शेटे( संस्थापक अध्यक्ष विश्व वारकरी सेना ), रमेश महाराज वाघ अध्यक्ष वारकरी प्रबोधन समिती,सदानंद महाराज साधू , विठ्ठल रुक्मिणी संस्था सचिव कौंडन्यपुर,पुरुषोत्तम महाराज पाटील ( संत चोखोबा राय आश्रम इसरूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा ),सोपान महाराज सानप शास्त्री
योगेश महाराज सुरळकर,श्री माधवराव बकाल( अध्यक्ष हनुमान मंदिर संस्थान केळीवेळी ), ओम देव महाराज चौधरी,( विदर्भ प्रमुख राष्ट्रीय वारकरी परिषद ),विठ्ठल महाराज चौधरी( जिल्हा अध्यक्ष विश्व वारकरी सेना अमरावती),यश नागपुरे( सदस्य विश्व वारकरी सेना नागपूर ),किरण महाराज शिंदे( राज्य संघटक महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ युवा शाखा व हिंदू राष्ट्र सेना वारकरी आघाडी ),आकाश पाटील भुतेकर( युवा शाखा वारकरी महामंडळ विदर्भ प्रमुख ),डॉ. गजानन उन्हाळे पाटील( महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ जिल्हा कार्याध्यक्ष बुलढाणा व हिंदुराष्ट्र सेना राज्य कार्यकारणी सदस्य ), एकनाथ महाराज तायडे ( जिल्हा कार्यकारणी सदस्य वारकरी महामंडळ बुलढाणा ), विश्वेश्वर जगन्नाथराव इंगोल( सिद्धिविनायक गणपती संस्थान वायगाव ता. भातकुली जि. अमरावती ), श्री सारंगधर बोंडे, दिनकर पाटील, प्रवीण महाराज काटकर( वारकरी महामंडळ वर्धा जिल्हा सचिव ), मयूर महाराज दरने( अखिल भारतीय वारकरी महामंडळ वर्धा जिल्हा अध्यक्ष ), राहुल महाराज हजारे( महाराष्ट्र वारकरी महामंडळ वर्धा जिल्हा अध्यक्ष ),प्रकाश महाराज खंडारे
( जिल्हाध्यक्ष विश्व वारकरी सेना वर्धा ). यांची उपस्थिती लाभली