फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच २४ पैकी २२ग्रामपंचायतीवर एकतर्फी वर्चस्व :-श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण:-फलटण तालुक्यामध्ये एकूण २४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक पार पडल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रेणित राजे गट पॅनलच्या गाव पातळीवरील सहयोगी आघाड्यांनीच २४ग्रामपंचायती पैकी २२ग्रामपंचायतीवर घवघवीत यश मिळवले असून माननीय मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा एकतर्फी विजय असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले आहे. अपवादात्मक आमच्या हातातील विडणी ग्रामपंचायती मध्ये एकूण सदस्यांच्या १७ पैकी १३ जागा राजे गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच जिंकल्या आहेत फक्त सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थोडी दुफळी निर्माण झाल्याने विरोधी भाजप पॅनलला त्याचा फायदा मिळून सरपंच पद व तीन सदस्य त्यांचे निवडून आले आहेत.
पण बहुमतामध्ये विडणी ग्रामपंचायत पूर्णपणे राजे गटाकडेच आध्याप आहे हे तेथील निकालावरून दिसत असल्याचे संजीवराजे यांनी स्पष्ट केलेआहे. सुरवडी ग्रामपंचायती मध्ये प्रल्हाद साळुंखे पाटील यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली असून गिरवी ग्रामपंचायती मध्ये सह्याद्री भैया कदम यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र पॅनेलने आपली सत्ता त्या ग्रामपंचायती मध्ये स्थापन केली आहे.त्यामुळे सध्या तरी २४ ग्रामपंचायती पैकी फक्त सुरवडी आणि गिरवी याच दोन ग्रामपंचायती वगळता बाकीच्या २२ ग्रामपंचायती अद्यापही पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालीच गाव पातळीवरीलआघाड्यामध्येच विजय झालेले आहेत असे विजयी उमेदवारांच्या भेटीवरून व एकंदरीत ग्रामपंचायत निकालाच्या कलावरून दिसून येत असल्याची माहिती रात्री उशिरा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांना दिली आहे.