तळोदा- सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनाची तयारी जोरदार सुरू असून या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित लावावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले यांनी केले आहे.
सदर शिक्षकेतर संघटनेच्या राज्य महामंडळाचे ५० वे (सुवर्ण महोत्सवी) राज्य अधिवेशन सांगली येथील कर्नाळ रोडवरील धनंजय गार्डन येथे दिनांक ८ जानेवारी २०२३ ला पार पडणार आहे. सदर या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच अनेक मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनामध्ये शिक्षकेतरांचा अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये २०१९ च्या नवीन आकृतीबंधानुसार शिक्षकेतरांची नवीन भरती सुरू करणे, आश्वासित प्रगती योजना म्हणजे १०-२०-३० लागू करणे, शिक्षकेतरांना पदोन्नतीची संधी देणे यांसह शिक्षकेतरांचा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, अध्यक्ष अनिल माने आणि सर्व राज्य पदाधिकारी तसेच सांगली जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत.
त्यामुळे या महत्वपूर्ण अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले, कार्यवाह सय्यैद इसरार, उपाध्यक्ष माधव पाटील, महेंद्र सूर्यवंशी, जुबेर सर, प्रशांत पवार, जयेश वाणी, अमित मराठे, संजय भामरे, प्रदीप चव्हाण, गाडे, अस्लमभाई, नरी, निलेश पाटील, योगेश चव्हाण, रामा चव्हाण, पंचोली, सुनिल वायकर,गुंजन शहा, ठाकरे, मीना वसावे आदींनी केले आहे.
सांगली येथे होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनाची जोरदार तयारी चालू असून या ऐतिहासिक अधिवेशनात शिक्षकेतरांच्या प्रलंबित प्रश्नांना निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु यासाठी सर्वांची उपस्थिती महत्त्वाची असून आपली ताकद व आपली एकजूट दाखवण्यासाठी सगळ्यांनी सांगली अधिवेशनास उपस्थित राहावे.
- डी. पी. महाले
जिल्हाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा.