पंढरपूर | कराटे स्पर्धेमध्ये ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल नांदुरे च्या खेळाडूंचे नेत्र दीपक यश
तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल नांदुरे च्या खेळाडूंचे नेत्र दीपक यश. शेवते येथे तालुकास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल नांदोरे च्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये संग्राम रघुनाथ जगताप या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच संग्रामची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये निवड ही करण्यात आली. तसेच तेजस भिंगारे व राज शिरसाट यांनीही. द्वितीय क्रमांक पटकाविला. हे यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन पर सत्कार संस्थेचे अध्यक्ष किरण भिंगारे तसेच संस्थेचे सचिव उमेश कदम मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबाबत ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल. व ज्युनिअर कॉलेजचे सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात आले