Type Here to Get Search Results !

नांगरमोडा येथे जव्हार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामीण पत्रकारिता संधी व आव्हाने याविषयी मार्गदर्शन संपन्न.



नांगरमोडा येथे जव्हार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामीण पत्रकारिता संधी व आव्हाने याविषयी मार्गदर्शन संपन्न.


पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर 




गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरात " आज जव्हार महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण पत्रकारिता संधी व आव्हाने याविषयी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना पत्रकारिता विषयी असलेले कोर्स ,डिप्लोमा, पदवी कोर्स, उच्च पदवीधर कोर्स यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पत्रकारिता करण्यासाठी आपल्याकडे कोशल्य व वाचनाची आवड असणे गरजचे आहे तसेच पत्रकार हा लोकशाहीचा चोथा आधारस्तंभ असून पत्रकार हा निर्भीड पणे काम करणारा व जनतेचा आवाज सरकार पर्यत पोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तसेच ग्रामीण भागात काम करणारा पत्रकार,तसेच काम करीत असताना येणाऱ्या अडचणी तसेच विविध आलेलं अनुभव सांगून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण पत्रकार म्हणून आपली काय भूमिका आहे हे विविध उदाहरणे सांगून सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामीण पत्रकार हे काम करीत असतात.ग्रामीण भागात पत्रकार काम करीत असताना त्याला सामाजिक भान, विकास दृष्टिकोन, शोध पत्रकारिता इत्यादी कोशल्य आत्मसात करून काम करावे लागते तसेच ग्रामीण भागात अनेक विषय घेऊन आपण बातम्या बनवून समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो. त्याच बरोबर त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही एक अशी चळवळ आहे की यामध्ये विद्यार्थी स्वतः पुढे येऊन समाजात काम करण्याची सुरवात करीत असतात त्यामध्ये मी स्वतः एक राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामधून तयार झालेला विद्यार्थी आहे आणि आज मी तुमच्या पुढे उभा राहून बोलू शकतो हे शिबिरामधून मला सशिकायला मिळाले आहे असे मत मांडले. त्याच बरोबर दीपक कडलक यांनी विद्यार्थ्यांना सकाळ सत्रात सकारात्मक विचार याविषयी मार्गदर्शन करून राष्ट्रीय सेवा योजना ही चांगले नागरिक घडविण्यासाठी काम करत असुन आज समाजात चांगले नागरिक घडले पाहिजेत असे मत मांडून सकारात्मक ऊर्जा निर्माण केली तसेच आपल्या जीवनात जेवढं चांगले विचार घेता येतील तेवढे घ्यावेत असा सल्ला दिला.सदर श्रमसंस्कार शिबीर गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून यावेळी माजी उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, मच्छिंद्र वाघचौरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश अडसूळ, प्रा. अनंत आवळे, प्रा. मंगेश भले, व प्रा. सुधीर भोईर प्रा. प्रवीण नडगे, प्रा.ऋतुजा पाटील व तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे १३५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम चे सुत्रसंचलन आदेश गवळी, सिद्धी रावळ, यांनी केले.सदर शिबिरात विद्यार्थ्यांना सायंकाळी व्यसनमुक्ती, दारूबंदी,अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अभियान इत्यादी विषय घेऊन पथनाट्य,नाटिका सादरीकरण करून गावात जनजागृती केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad