Type Here to Get Search Results !

जामगुडा येथील समस्या मार्गी लावण्याचे पालकमत्र्यांचे निर्देश,



जामगुडा येथील समस्या मार्गी लावण्याचे पालकमत्र्यांचे निर्देश,


चंद्रपुर जिल्हाप्रतिनिधी मनोज गोरे


कोरपना तालुक्यातील माणिकगड पायथ्याशी असलेल्या जामगुळा बेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी लोक वस्ती असलेल्या गावांमध्ये बिबट हल्ल्यामध्ये नववर्षीय युवकाचा जीव गमावला या गावातील विद्युतीकरण रस्त्यावरील दोन छोट्या पुलाचे बांधकाम व वन विभागाअंतर्गत गावातील सभोवताल तारेचे कुंपण ही मागणी गावकऱ्यांनी केली होती गावातील विकासापासून कोस दूर असलेल्या या गावाकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे गावकऱ्यांमध्ये कमालीची दहशत होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी भेट देऊन गावातील समस्या वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते नागपूर विधिमंडळ अधिवेशनामध्ये वन मंत्र्यांची भेट घेऊन वाघाचा जेरबंद करावा तसेच जामगाव येथील समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावा असे निवेदन दिले होते याची दखल घेत तातडीने सीसीएफ वन विभाग जिल्हा प्रशासनाला जामगुळा येथील समस्या तातडीने मार्ग लावण्यासाठी नियोजन करा असे निर्देश दिले यामुळे जामगुळा येथील अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांची समस्या मार्गी लागण्याची आशा पल्लवी झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad