रिपब्लिकन फेडरेशनची उत्तुंग भरारी
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त तारांगण मतिमंद मुलांना खाऊचे वाटप
मुरबाड दिनांक 25 प्रतिनिधी लक्ष्मण पवार )
रिपब्लिकन एम्पलोयीज फेडरेशन ही एक शासकीय कर्मचारी, अधिकारी, निमशासकीय कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींचा नेहमीच आदर सनमान करत असून पुरस्कार रुपी त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे मनोबल वाढवत असते कष्टकरी, शोषित, पीडित लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ठाणे जिल्हा फेडरेशन कमिटी करत आहे
नुकताच पार पडलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या महबूब भाई पैठणकर सह तारा मावशी घायवट यांना समाज रत्न पुरस्काराने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शासकीय कर्मचारी यांच्या विविध समस्यांचे निवेदन पत्र फेडरेशनचे मुरबाड तालुका अध्यक्ष संतोष नागवंशी गौतम रातांबे ,उबाळे सर, संजय धनगर, विलास शिंदे या शिष्टमंडलने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना हिवाळी अधिवेशनात दिले असून लवकरच फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी अधिकारी विविध समस्यांपासून सुटकेचा श्वास घेतील. त्यातच आज मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेब यांचा आज 25 डिसेंबर रोजी 63 व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे मुरबाड तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तारांगण मतिमंद मुलांच्या शाळेत फळ वाटप तसेच विविध खाऊचे वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शन रामचंद्र थोरात मामा यांनी केले यावेळी ज्येष्ठ सल्लागार शिवराम उबाळे सर, संजय धनगर साहेब, गौतम रातांबे ठाणे जिल्हा सरचिटणीस, तालुका अध्यक्ष सेवक नागवंशी, सरचिटणीस विलास शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जाधव व विशाल चंदणे. हे उपस्थित होते