विठ्ठलराव शिंदे.सह.साखर कारखान्यामार्फत व मा.आ. बबनदादा शिंदे यांच्या संकल्पनेतून एकरी १०० टन उत्पादन उद्दिष्ट या योजनेंतर्गत बेंबळे गटातील मौजे घोटी येथील सभासद श्री.पवार दिपक छगन यांचे ०.८० आर क्षेत्र लागण दि.-०१/०७/२०२१ या तारखेचा ऊस ५०-५५ कांड्यावरती आहे. एक ऊस सरासरी ०४ किलो ५००ग्रॅम एवढे वजन भरत आहे. या प्लॉटमध्ये २३६.३५१ मे. टन. म्हणजेच एकरी ११८ मे.टन. उत्पन्न घेऊन को-८६०३२ जातीमध्ये विक्रमी उत्पादन घेतले आहे. सदर सभासदास कृषिरत्न मा.श्री.डॉ.संजीव दादा माने विठ्ठलराव शिंदे.सह.साखर कारखान्याचे केन मॅनेजर मा.श्री.थिटे साहेब; ; मुख्य शेती आधिकारी मा.श्री.बंडगर साहेब; ऊस विकास आधिकारी श्री.लगड साहेब; कृषिभुषण श्री.सोमनाथ हुलगे ॲग्रीओव्हरसियर श्री.चिंतामण साहेब व बिटप्रमुख महाडिक डी एस यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले.
तरी कारखान्याच्या सर्व सभासदानी श्री.पवार दिपक छगन यांच्या प्रमाणे ऊत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विठ्ठलराव शिंदे.सह.साखर कारखान्यामार्फत करण्यात आले आहे.