कुटासा येथे पंजाबराव देशमुख जयंत्युत्सवाचे उद्घाटन संपन्न
कुशल भगत अकोट
अकोट..श्री शिवाजी विद्यालय कुटासा येथे शिक्षण महर्षी, कृषीरत्न डाॅ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब यांच्या जयंती निमित्त विविध शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यांचा उद्घघाटन समारंभ दिनांक २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता भाऊराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तर जयंत्युत्सवाचे उद्घघाटन संस्था उपाध्यक्ष अँड गजाननराव पुंडकर प्रभारी मुख्याध्यापक संतोष चरपे सर भाऊराव देशमुख पंजाबराव कवटकार मा.सरपंच माधवराव चतार डॉ.अशोकराव देशमुख डॉ.गजानन झटाले श्रीराम कापसे पोलीस पाटील गजाननराव उगले रमेश तरोळे गजाननराव कवटकार शेषराव भगत सुरेश बापु देशमुख गजाननराव थोरात यांनी केले,
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग व सर्व शिक्षक वर्गाची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर मान्यवरांचे हस्ते पाक कला हस्तकला रांगोळी स्पर्धा इतर कलांचे यावेळी उद्घघाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक संतोष चरपे सर यांनी केले तर सुत्र संचालन अंकुश देशमुख सर यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर राऊत सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव प्रमुख सतिष चतार सर व इतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.