Type Here to Get Search Results !

हिमायतनगर सज्जाच्या तलाठ्याची धडाकेबाज कार्यवाही



हिमायतनगर सज्जाच्या तलाठ्याची धडाकेबाज कार्यवाही 

अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून केली कार्यवाही..

हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/-


शहरा सह तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात होत असल्याने निसर्गाचा समतोल बिघडून परिणामी नदी नाले उन्हाळ्या अगोदरच कोरडे ठक पडत आहेत. ह्याची हिमायतनगर महसूल प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन एक पथक नेमून कार्यवाही केल्याने अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे… दिनांक 30 डिसेंबरच्या सायंकाळी अंदाजे रात्री आठ ते नऊच्या दरम्यान नेहरूनगर परिसरात रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर क्र. MH 26 T 2821 ह्या ट्रॅक्टरने एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून हिमायतनगर सज्ज्याचे तलाठी दत्तात्रय पुणेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन हदगाव येथील उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील व हिमायतनगर चे तहसीलदार गायकवाड साहेब व मंडळ अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ट्रॅक्टर वर महसूल प्रशासनाचा दंड आकारून हिमायतनगर पोलीस स्थानकात ती गाडी लावली आहे त्यांच्या या धडाकेबाज कार्यवाहीने हिमायतनगर शहरासह तालुक्यातील अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले असल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरासह तालुक्यात होत असलेली अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी हदगाव येथील उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील व हिमायतनगर चे तहसीलदार गायकवाड यांनी एक पथक नेमून कार्यवाही करण्याचे आदेश महसूलच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना देण्यात आले होते त्यानुसार हिमायतनगर येथील सज्जाचे कर्तव्यदक्ष तलाठी दत्तात्रय पुणेकर यांनी काल दिनांक 30 डिसेंबर च्या सायंकाळी ऑन दि स्पॉट नेहरू नगर परिसरात जाऊन अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही केली त्यामुळे वाळू माफियांमध्ये पुन्हा महसूल प्रशासनाची दहशत निर्माण झाली आहे या अवैध वाळू वाहतुकीच्या प्रचंड वेगाने हिमायतनगर शहरातील अनेक नागरिकांना रस्त्याने जातांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता या कार्यवाहीने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याचे चांगलेच कंबरडे मोडले असल्याचे शहरात बोलल्या जात आहे त्यामुळे हदगाव येथील उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील व हिमायतनगर चे तहसीलदार गायकवाड व मंडळ अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पुणेकर यांनी केलेल्या कार्यवाहीचे शहरात कौतुक होत आहे…

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad