जागतिक एड्स दिनानिमित्त व्याख्यान आणि पोस्टर स्पर्धा
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा ,येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त व्याख्यान आणि पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त महाविद्यालयात रेड रिबन क्लब ची स्थापना आणि जागतिक एड्स दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.एस.एन.शर्मा हे अध्यक्षस्थानी लाभले होते .तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथील राखी पारेख आणि डॉ सुधीरकुमार श्रीवास्तव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा डॉ.एस .आर गोसावी सिनेट सदस्य, प्रा . जे एन शिंदे, प्रा ललित पाटील, प्रा स्वप्नील वाणी ,महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ.महेंद्र माळी ,डॉ साहेबराव चव्हाण व इतर प्राध्यापक उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा पंकज सोनवणे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पराग तट्टे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा डॉ.महेंद्र माळी यानी केले .
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राखी पारेख मॅडम आणि डॉ सुधीर कुमार श्रीवास्तव यांनी एड्स या आजाराच्या संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे डॉ.एस.आर.गोसावी यांनी आपल्या अध्यक्ष मनोगत भारतातील एड्सचे वाढते प्रमाण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एड्स दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून एड्स या आजाराविषयी जनजागृती केली. सदर पोस्टर्स स्पर्धेमध्ये 33 विद्यार्थ्यांनी आपले पोस्टर सादर केलेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला कार्यक्रमाधिकारी डॉ सुनिता गायकवाड आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी योगदान दिले.