भीमाई भूमीत, दि भीमाई पतसंस्थेचे भव्य उदघाटन
मुरबाड दि. 1 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड तालुका म्हटले कि समोर येते ते डॉ. बाबासाहेब यांचे आजोळ, म्हणजेच भीमाईचे माहेर या ऐतिहासिक तालुक्यात संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून दि भीमाई मागासवर्गीय को. ऑप. क्रेडिट सोसायटी मुरबाड तालुका लि. चे ऍड. बी. जि. बनसोडे, वकील मुबंई उच्च न्यायालय यांच्या हस्ते भीमाई भूमीत उदघाटन करण्यात आले.
मुरबाड मध्ये मोठया थाटा-माटात भव्य-दिव्य स्वरूपात हा उदघाटन सोहळा कुणबी समाज भवन येथे पार पडला.
महात्मा फुले, शाहूजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचार सरणीतून, बहुजन समाजाचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावला पाहिजे, तरच बहुजन समाजाची आर्थिक प्रगती होईल. या विचारानी प्रेरित होऊन या पतसंस्थेची स्थापना झाली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश पवार हे बुद्ध,शिव, फुले, शाहू, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चळवळीत गेली 27 वर्षे काम करीत आहेत, मुरबाड तालुक्यामधील शोषित, पीडित, वंचित, घटकांचा आर्थिक स्तर उंचावला गेला पाहिजे, या हेतूने ते अतिशय मोलाचे कार्य करीत आहेत.
हा अत्यंत धाडसी निर्णय घेऊन यापुढे सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक, व्यावसायिक,आरोग्यदायक व स्वाभिमानाचे जीवन बहुजन समाज व्यतीत केल्याशिवाय राहाणार नाही बहुजन समाजाने त्यांच्या या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात साथ देऊन बहुजन समाजाचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता अनेक अधिकारी, कर्मचारी व छोटे मोठे व्यावसायिक पुढे सरसावले आहेत. यामुळे भविष्यात भिमाई मागासवर्गीय सहकारी पतसंस्था मुरबाड तालुका मर्यादित ही लवकरच मुरबाड मधील नामांकित पतसंस्थेमधील एक पतसंस्था होईल यात तिळमात्र शंका नाही.
तालुक्यातील मागासवर्गीयासांठी ही पहिलीच पतसंस्था आहे. यामुळे मागासवर्गीयांना छोटे -मोठे व्यवसाय सुरु करण्यासाठी बहुजन समाजातील महानायक व महानायिका यांच्या नावाने विविध कर्ज योजना सुरु करण्याचा पतसंस्थेचा मानस आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्याम गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष, आर. पि. आय. सेक्युलर, राजेश पवार, राष्ट्रीय सचिव भा. बौ. महासभा. डॉ. सतीश गायकवाड, संचालक औरंगाबाद जि. स. बँक, कमलाकर पारधे संयोजक भा. बौ. महासभा मराठवाडा विभाग, एड. रघुनाथ महाले, प्रदेश अध्यक्ष अखील भारतीय ओबीसी महासभा,राजेंद्र दोंदे सेवानिवृत्त सी इ ओ ठाणे ज़िल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सत्यजित साळवे, संपादक शासन कर्ता, उत्तम जोगदंड, कार्यकारी संपादक अनिस पत्रिका,संजय धनगर, ठाणे जिल्हा अध्यक्ष कर्मचारी महासंघ,अनिल सोनोने प्र.पोलीस निरीक्षक, रामदास भोईर माजी अध्यक्ष भिमाई सहकारी पतसंस्था शहापूर,अप्पाराव थोटे, प्रदेश सदस्य ब.स. पा., ज्ञानेश्वर वाघेरे,सचिव कुणबी युवा शहापूर,प्रवीण केदारे विभागीय अध्यक्ष वासिंद आर पी आय सेक्युलर, भगवान पवार,जेष्ठ नेते आर. पि. आय. ठाणे रवींद्र चंदणे,ठाणे ज़िल्हा अध्यक्ष आर.पि. आय. (से),बुधाजी मुकणे, सामाजिक कार्यकर्ता, गौतम रातांबे, कार्याध्यक्ष,बुद्धिस्ट फोरम, हर्षराज फुलपगार अध्यक्ष मुरबाड विधानसभा ब.स. पा.,गुरुनाथ पवार, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अण्णा साळवे,अध्यक्षअन्याय अत्याचार निर्मूलन समिती ठाणे ज़िल्हा,दिनेश उघडे अध्यक्ष आर पी आय मुरबाड तालुका,रवींद्र देसले, मा. नगरसेवक, शिवराम उबाळे अध्यक्ष बुद्धिस्ट फोरम, लक्ष्मण खोळंबे अध्यक्ष आर पी आय सेक्युलर, महेंद्र धनगर अध्यक्ष रीएफे मुरबाड तालुका , रवीशेठ जोशी उद्योजक, संजय उबाळे उद्योजक, दिलीप साटपे उद्योजक, रवींद्र भोईर अध्यक्ष पोलीस पाटील संघटना, सेवक नागवंशी मा. उपसरपंच, प्रकाश जाधव पत्रकार, संजय बोरगे,पत्रकार, संतोष गायकर, पत्रकार सुभाष जाधव, पत्रकार, लक्ष्मण पवार पत्रकार,शंकर करडे पत्रकार, ऍड. संदीप जाधव, मनीष जाधव, अविष्कार दोंदे, कैलास गायकवाड, आनंद गायकवाड वासिंद शहर अध्यक्ष ब. स. पा. शिवाजी चन्ने मुरबाड शहर अध्यक्ष आर पी आय. एकतावादी,एस. एल. पवार सेवा निवृत्त वनपाल ऍड. शरद थोरात, कांचन उघडे, कांचन भोईर, संतोष जाधव, हे अतिथी म्हणून उपस्थितीत होते. *सदर कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन* *ऍड. विलास धनगर, सल्लागार यांनी केले. स्वागताध्यक्ष म्हणून धनाजी सुरोसे व जगदीश बांगर हे होते. प्रास्ताविक संस्थेचे सचिव दयानंद रातांबे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन प्रा. विलास डोंगरे यांनी केले.आभाराचे मोलाचे कार्य संस्थेचे उपाध्यक्ष विजय खोळंबे यांनी केले*. *कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. यासाठी पतसंस्थेचे सल्लागार, विजय ठोसरे,मधुकर थोरात,सुदाम गायकवाड, चंद्रकांत वाघचौडे, किसन रातांबे, शिवराम धनगर, विजय माळवे, यांनी व संचालक राजेश चंदने, स्वाती धनगर,अतुल जाधव, पद्माकर पवार, पंकज रणदिवे, नितीन खंडागळे, किरण गायकवाड, भरत तपासे, यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल समाजात त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी तालुक्यातील बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.