राजीविहिर गृ.ग्रा.पं. सरपंच पदासाठी 2 अर्ज तर सदस्य पदासाठी 9 अर्ज दाखल
तळोदा तालुक्यातील राजविहिर ग्रुप ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदासाठी 2 नामांकन व सदस्य पदासाठी 9 नामांकन असे एकूण 11 नामांकन दाखल झाले आहे
तळोदा तालुक्यातील राजविहिर ग्रुप ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक नामांकन दाखल प्रक्रिया सुरू आहे आज नामांकन दाखल च्या दुसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी 2 नामांकन तर सदस्य पदासाठी 9 नामांकन पत्र दाखल झाले आहे. अशी माहिती तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिली आहे. दि 2 डिसेंम्बर पर्यंत नामांकन दाखल ची शेवटची मुदत आहे किती अर्ज दाखल होतात उत्सुकता लागली आहे.
दरम्यान राजीविहिर हे गांव पं. स.माजी सभापती आकाश वळवी, जि. प.माजी सदस्य सतीश वळवी व काँग्रेस कमिटी माजी अध्यक्ष रोहिदास पाडवी व पं. स. सदस्या सोनी पाडवी यांचे गांव असल्याने राजकीय दृष्ट्या महत्वाचे गणले जाते म्हणून या निवडणुकी कडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.