Type Here to Get Search Results !

ग्रंथोत्सवात सहभागासाठी पुस्तक विक्रेते व प्रकाशकांना आवाहन



ग्रंथोत्सवात सहभागासाठी पुस्तक विक्रेते व प्रकाशकांना आवाहन


नंदुरबार, दि.30 राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा मंगल कार्यालय, नंदुरबार येथे 5 व 6 डिसेंबर, 2022 रोजी ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे, या ग्रंथोत्सवात पुस्तक विक्रेते व प्रकाशकांना सहभागासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे. 


या ग्रंथोत्सवांत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, बालभारती अशा नामवंत प्रकाशकांचे ग्रंथ, पुस्तके विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात येणार असल्याने प्रकाशन संस्था व पुस्तक विक्रेत्यांनी 4 डिसेंबर, 2022 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नंदुरबार टोकर तलाव रोड, जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या बाजुला, नंदुरबार येथे दूरध्वनी क्रमांक 02564-210201 व भ्रमणध्वनी क्रमांक 9421619018 वर संपर्क साधावा, असेही जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. वळवी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad