नेमसुशिलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
तळोदा:- शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पाचवीच्या वर्गासाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षेत एकोणतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात चौदा विद्यार्थी पात्र झाले असून माही माळी फाल्गुनी सागर लिना चौधरी वैभवी व्हरगड योगिनी परदेशी हर्षिता मगरे ओजस्वी मगरे नैतिक मगरे आदर्श सागर दर्शित शेंडे हितेश चौधरी सिद्धेश मेटकरी प्रियांशी माळी हर्षदा जानकर या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल समनव्यक हर्षिल तुरखीया मुख्याध्यापिका पुष्पा बागुल मुख्या.गणेश बेलेकर शिक्षक अरुण कुवर कमलेश पाटील सागर मराठे प्रतिभा गुरव अश्विनी भोपे निलिमा वसावे नितीन भामरे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.