Type Here to Get Search Results !

तळोद्यात श्री.दत्तजयंती निमीत्त अखंड नामजप यज्ञ-याग सप्ताह



तळोद्यात श्री.दत्तजयंती निमीत्त अखंड नामजप यज्ञ-याग सप्ताह

  तळोदा शहरात दिनांक १ डिसेंबर पासून श्री. दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ-याग सप्ताहाचे आयोजन श्री. स्वामी समर्थ केंद्र तळोदा येथे करण्यात आले आहे. 


 श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिंडोरी प्रणित अखंड नामजप यज्ञ सप्ताह ला तळोदा शहरात दिनांक १ डिसेंबर २०२२ पासून सुरुवात करण्यात येत आहे. या सप्ताहात अखंड प्रहर सेवा होणार आहे यात सात दिवस चोवीस तास तास अखंड सेवा सुरू राहणार आहे. या सेवेत विणावादन,  श्री. स्वामी समर्थ मंत्र, जप श्री. स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन होणार आहे. या सेवेत दिवसातून एक तास आपण दिल्याने आपले आजारपण, पीडा , दूर होऊन आयुष्य वृद्धिंगत होते अशी स्वामी समर्थ  सेवेकऱ्यांची अतूट श्रद्धा व भक्ती आहे. व तसा अनुभव देखील बऱ्याच सेवेकरी भक्तांना आला आहे. हिंदू धर्मातील पाचवा वेद, समस्त मानवी जीवनातील दुःख येणारी संकटे, पीडा, शाप, दोष, यावर एक रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण होय. गुरुचरित्र पारायण वाचनाने चमत्कारिक अनुभवांची जाणीव होते व मानवी जीवनातील इच्छा, प्रश्न सोडवण्यासाठी एक संजीवनी म्हणजे गुरुचरित्र पारायण होय अशा या शक्तिशाली मंत्रांनी भरलेल्या ग्रंथाच्या वाचण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी व सेवेकऱ्यांनी आपले नाव श्री स्वामी समर्थ केंद्रात नोंदवुन आपली सेवा रुजू करावी. तसेच या सप्ताहात प्राधानिक स्वरूपात भागवत पारायण, नवनियुक्त गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री स्वामी चरित्र पारायण, श्री नवनाथ पारायण, या सेवा देखील होणार आहे.

दि. ३० डिसेंबर वार बुधवार

रोजी ग्रामदेवता सन्मान, मव मंडल मांडणी, दि.१ डिसेंबर वार गुरुवार रोजी स्थापना, स्थापित देवता हवन, नित्यस्वाहाकार दि.२ डिसेंबर वार शुक्रवार रोजी नित्यस्वाहाकार, गणेश याग दि.३ डिसेंबर वार शनिवार रोजी नित्यस्वाहाकार, स्वामी याग, दि.४ डिसेंबर वार रविवार रोजी नित्यस्वाहाकार, गीताई याग, दि.५ डिसेंबर वार सोमवार रोजी नित्यस्वाहाकार, चंडी याग दि.६ डिसेंबर वार मंगळवार रोजी नित्यस्वाहाकार, रुद्रयाग दि.७ डिसेंबर वार बुधवार रोजी नित्यस्वाहाकार, बलीपुर्णाहुती दुपारी: १२:३९ वा. श्रीदत्त जन्मोत्सव. दि.८ डिसेंबर वार गुरुवार रोजी श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, सांगता महाप्रसाद व नंतर या सप्ताहाची सांगता होणार आहे तळोदा शहर व तालुक्यातील व परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी या सप्ताहात सहभागी व्हावे असे आव्हान श्री स्वामी समर्थ केंद्र तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad