शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या 96 व्या जयंती निमित्त अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी ब्रिटिशांशी लढा देणारे हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त दि.28 डिसेंबर रोजी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकात प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ. त्र्यंबक पटेल यांच्या हस्ते हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले तर भामरे अकॅडमीचे संचालक प्रा. युवराज भामरे यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रास्ताविकात हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या कार्याला उजाळा दिला. जयंती दिनाचे औचित्य साधुन शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे आगामी 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या समारंभास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी, दंतचिकित्सक डॉ. धीरज महाजन, स्पर्श हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत ठाकरे,आधार हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश ठाकरे,डॉ. प्रसाद अंधारे,
डॉ. विलास दाणेज,अनुसयअकॅडमीचे संचालक प्रा. विनायक ढोले, अभियंता धनंजय जोशी, सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक,हॉटेल डीएसकेचे संचालक उद्योजक प्रशांत जैन, गुंतवणूक सल्लागार सुरेश जैन, राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीत राजपूत, भील प्रदेश ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी, निषाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रतापराव सोनवणे, महिला महाविद्यालयाचे प्रा. मधुकर देसले,ग्रंथपाल श्रीराम दाऊतखाने, पोस्ट विभागाचे भटू गवळी, रुद्र क्रिएशनचे संचालक योगेश्वर जळगावकर, सुवर्ण व्यावसायिक आशिष जळगावकर, निवृत्त गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी, ,प्रा. ललित महाजन, पत्रकार हिरालाल चौधरी , योगेंद्र जोशी ,मनोज शेलार, वैभव करवंदकर, अमित कापडणे,प्रशांत पाटील,सुमानसिंग राजपुत सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय रघुवंशी,कमल कडोसे, चेतन राजपुत, पवन राजपुत,दिलीप कुभांर, डॉ.भुषण पालकडे,मोहन वाडिले, अनिल मांडवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सदस्य विशाल हिरणवाळे, धिरेन गवळी, मयुर भोई,जयदिप वानखेडे, यांनी केले.शहिद दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांनी भारत माता की जय... वंदे मातरम... तसेच नंदुरबार के शहीद अमर रहे... अशा घोषणा दिल्या.
फोटो कॅप्शन - नंदुरबार येथील बालवीर चौकात शहिद शिरीषकुमार मेहता यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी उपस्थित डॉ. त्र्यंबक पटेल,,सोबत प्रा. युवराज भामरे ,डॉ. धीरज महाजन,कालिदास पाठक,सुरेश जैन,प्रशांत जैन, महादू हिरणवाळे, पत्रकार हिरालाल चौधरी, मनोज शेलार, , वैभव करवंदकर, मधुकर देसले,श्रीराम दाऊतखाने, योगश्वर जळगावकर, आशिष जळगावकर,
प्रतापराव सोनवणे,